Skip to main content

७/१२, ८अ आणि जमिनीचा नकाशा व इतर सेवांचा लाभ घ्या आता फक्त एका क्लिकवर; पाहा संपूर्ण माहिती!

Mahabhumi LandStack New update info
"Mahabhumi LandStack new update "

🔹Mahabhumi LandStack - 

 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी,व जमीनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे .राज्यातील सर्व शेतकरी बांधव आणि जमीनधारकांना आता फक्त एका क्लिक वर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारने महाभूमी अभिलेख जमीन नोंदी,व जमिनीशी निगडीत संदर्भात अत्यंत महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे .हा उपक्रम महाराष्ट्र महसूल आणि वन विभागामार्फत चालविला जातो . शेतकऱ्यांना व जमीनधारकांना जमिनीशी निगडीत सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध व्यवहात यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म Mahabhumi LandStack तयार करण्यात आले आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत Mahabhumi LandStack चे फायदे, जमिनीचे जुने कागदपत्रे कसे पाहावे, रजिस्ट्रेशन कसे करायचे ,7/12, 8अ, फेरफार, न्यायालयीन खटले स्थिती, फेरफार साठी अर्ज , ई-मोजणी, शेतजमिनीचा डिजिटल नकाशा व इतर कसे बघावे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

🔹Mahabhumi म्हणजे काय ?

Mahabhumi LandStack हा एक महाराष्ट्र शासनाचा भू- अभिलेख ,आणि महाराष्ट्र महसूल विभागामार्फत चालविला जाणारा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.जमिनीच्या सर्व नोंदी पारदर्शक आणि सहजरित्या नागरिकांना उपलब्ध होईल हा ह्या पोर्टल चा मुख्य उद्देश आहे.

ह्या पोर्टल वर तुम्हाला जमिनीशी निगडीत 7/12, 8अ, फेरफार, ई-मोजणी, जमिनीचे जुने कागदपत्रे, डिजिटल गाव नकाशा, मालमत्ता नोंदी, व तसेच इतर विविध प्रकारची माहिती पाहता येते व डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे डाउनलोड ही करता येतात आणि फक्त डाउनलोड करण्यासाठी नाममात्र शुल्क भरून तुम्हाला अधिकृत  डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे  डाउनलोड करता येतात आणि सरकारी कामांसाठी,शेतकरी योजनेसाठी, उदा.(पिक कर्ज, पिक विमा,mahadbt योजना) वापरात देखील येतात. पोर्टल वर असलेले शुल्क दर हे प्रत्येक सेवांसाठी वेगवेगळे असतात पण कागदपत्रे बघणे निःशुल्क आहेत .ह्याच पोर्टल वर Mahabhumi LandStack ही आणखी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🔹Mahabhumi LandStack म्हणजे काय ?

Mahabhumi LandStack  ही एक Mahabhumi पोर्टल वरील आणखी एक पुढची आधुनिक आणि डिजिटल पायरी आहे. जमिनी संबंधित सर्व डिजिटल सेवा एकाच छताखाली आणणारी एक अधिकृत डिजिटल सेवा आहे . Mahabhumi LandStack वर जमिनी संबंधित सर्व माहिती फक्त आता एका क्लिक वर मिळणार आहे .या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयाला फेरफटका मारण्याची गरज भासणार नाही.

🔹Mahabhumi LandStack साठी  नोंदणी कशी करावी ?

📍Regular login साठी - 

  • सर्वप्रथम https://mahabhumi.gov.in ह्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.
  • पोर्टल उघडल्यानंतर होमपेजवर तुम्हाला तीन पर्याय दिसतील त्यापैकी Mahabhumi LandStack हा पर्याय निवडा .
  • त्यानंतर Rural Services (ग्रामीण विभाग) आणि Urban Services हे दोन्ही पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्ही ग्रामीण भागातील असताल तर Rural Services हा पर्याय निवडा आणि जर तुम्ही शहरी विभागातील असताल तर Urban Services हा पर्याय निवडा.
दोन्हीपैकी एक पर्याय निवडा असेल तर नवीन नोंदणीसाठी login बटनाखाली Register here इथे click करा.
  • User ID तयार करा ( तुमच्या लक्षात राहील असा ) उदा-User1234.
  • Password requirement नुसार password तयार करा.
  उदा- U1@ser12345

  1.  किमान 8 ते कमाल 20 अक्षरे लांब 
  2.  किमान एक मोठे अक्षर (A to Z ) पर्यंत 
  3.  किमान एक लहान अक्षर (a to Z) पर्यंत 
  4.  किमान एक अंक (0 ते 9 ) पर्यंत 
  5. किमान एक विशिष्ट चिन्ह ( $,@,*,^,%,#,!) 
  • त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, ई मेल ID, मोबाईल नंबर, जन्मतारीख, लिंग, सुरक्षा प्रश्न आणि सुरक्षा उतर भरून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्ही लॉगिन तुमचा user ID आणि Password भरून login करू शकता.लॉगिन झाल्यावर तुम्ही 7/12 ,8 अ, फेरफार, गाव नकाशा, जुनी कागदपत्रे, न्यायालयीन खटले स्थिती हे सर्व आवश्यक ती माहिती(जिल्हा➡️ तालुका➡️ गाव ➡️गट नंबर) निवडून बघू शकता .

🔹OTP Base Login साठी:

Registration करावेच असे काही अनिवार्य नाही तुम्ही  OTP Base Login मार्फत सुद्धा ह्या सेवेचा लाभ घेऊ शकता. 

  • अधिकृत वेबसाइट वर भेट दिल्यानंतर Rural Services ( ग्रामीण भाग)  किंवा Urban Services ( शहरी विभाग) या दोन्ही पर्यायांपैकी जर तुम्ही ग्रामीण भागातील असताल तर Rural Services वर Click करा आणि जर तुम्ही शहरी भागातील असताल तर तुम्ही Urban Services वर क्लिक करा यांपैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर Regular login आणि OTP लॉगिन यांपैकी OTP login वर क्लिक करा.
  • मोबाईल क्रमांक भरा आणि Send OTP यावर क्लिक करा.
  • OTP क्रमांक भरून CAPTCHA भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
लॉगिन झाल्यावर तुम्हाला वरील दिलेल्या सर्व सेवा उपलब्ध होतील.

🔹Mahabhumi LandStack चे फायदे

जमिनीसंदर्भात सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असल्यामुळे वारंवार वेगवेगळ्या वेबसाइट बघाव्या लागत नाही व कार्यालयाला फेरे मारावे लागत नाही. Mahabhumi LandStack हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे घरबसल्या मोबाईल वर किंवा कॉम्प्यूटर वर जमिनीची सर्व माहिती बघू शकता .

.पूर्वी शेतकऱ्यांना व जमीनधारकांना प्रत्येक कागदपत्रासाठी वेगवेगळे कार्यालय व वेगवगेळ्या वेबसाईटला भेट द्यावी लागत होती खूप वेळखाऊ प्रक्रिया होती पण आता महाराष्ट्र महसूल विभागाने जमिनीसंदर्भात सर्व सेवांसाठी Mahabhumi LandStack हे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामुळे आता घरबसल्या जमिनीच्या नोंदी,7/12, फेरफार, नवीन फेरफारसाठी अर्ज, ई-मोजणी साठी अर्ज, न्यायालयीन खटल्यांची स्थिती, गाव नकाशा ह्या सर्व सेवांचा लाभ घेता येतो.

 शेतकऱ्यांसाठी शेतजमीन ही सर्वात मोठी मालमता असते त्यामुळे शेतजमिनीचे कागदपत्रे अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अत्यंत अचूक,अधिकृत,विश्वसनीय व झटपट महत्वाचे कागदपत्रे आता सहज उपलब्ध होत असल्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी व जमीनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बाब आहे.

जमीन खरेदी व विक्री व्यवहार करताना जमिनीचा इतिहास जाणून घेणे खूप महत्वाचे असते . जमिनीवर काही पिक कर्ज आहे का ?, जमीन गहाण ठेवून कर्ज काढलेले आहे का ? जमीन हद्दीतील विहिरी ची नोंद , विहीर वहिवाट,शेत रस्ता आहे का ,एखाद्या झाडाची नोंद आहे का ? ह्या सगळ्यांची नोंद ही 7/12 वर नमूद असते . जमिनीच्या नोंदी मध्ये कसा बदल झाला , जुन्या फेरफार मधील नोंदी हे फेरफार वरून कळते.8 अ वरून जमीन मालकाच्या नावावर एकूण किती जमिनीच्या क्षेत्रफळाची नोंद आहे. जमिनीचा एकूण नकाशा कसा आहे हे डिजिटल नकाशा द्वारे कळते , जमिनीची ई मोजणी झालेली आहे का, जमिनीच्या ई- मोजणी k प्रत वरून कळते. जमिनी संदर्भात काही न्यायालयीन खटले चालू आहेत का याची स्थिती व इतर  शेतजमिनी बद्दल सर्व माहिती आता एका क्लिक वर मिळणार असून शेतजमिनीच्या बदलाची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे शेतजमिनीच्या गैरव्यवहाराला आळा बसू शकतो व शेतजमीनीबद्दल शेतकरी व जमीनधारकांना मध्ये जागरूकता निर्माण होऊ शकते.

🔹FAQ

Mahabhumi LandStack हे पूर्णपणे मोफत आहे का ?

उत्तर:- हो. हे डिजिटल प्लॅटफॉर्म राज्यातील सर्व शेतजमीन व जमीनधारकांसाठी वापरण्यास अगदी मोफत आहे.

महाभूमी अभिलेख हे पूर्णपणे मोफत आहे का ? 

उत्तर:- नाही.तुम्हाला जर डिजिटल स्वाक्षरीत शेतजमिनी संदर्भात कागदपत्रे डाउनलोड करायची असल्यास  सशुल्क सेवा आहे.कागदपत्रानुसार सशुल्क वेगवेगळे असू शकतात.

महाभूमी अभिलेख यावरील डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे सरकारी व शेतकरी योजनांसाठी वापरता येतात का ?

उत्तर:- हो. डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे तुम्हाला  सरकारी व शेतकरी योजनांसाठी वापरता येऊ शकतात.

Mahabhumi LandStack ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती किती सेवांचा लाभ घेता येतो ?

उत्तर:- Mahabhumi LandStack डिजिटल प्लॅटफॉर्म वर जमिनी संबंधित 712, 8अ, फेरफार, शेतजमिनीचे जुने कागदपत्रे, डिजिटल गाव नकाशा, मालमता नोंदी, व इतर सेवांचा लाभ घेता येतो.

Mahabhumi LandStack वर मिळणारी माहिती किती विश्वासार्ह आहे ?

उत्तर:- Mahabhumi LandStack हे सरकारी अधिकृत पोर्टल असल्यामुळे त्यावरील माहिती अचूक व पारदर्शक आहे.

Mahabhumi LandStack वर नोंदणी करणे अनिवार्य आहे का ? 

उत्तर:- नाही . तुम्ही OTP द्वारे लॉगिन करू शकता व सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.


Mahabhumi LandStack वर हेल्पलाईन किंवा तक्रार सुविधा आहेत का ?
उत्तर:- हो. 
हेल्पलाईन क्रमांक :- 020-25712712
वेळ:- सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधू शकता.

शेतकऱ्यांना mahabhumi LandStack वापरण्याचा काय फायदा होतो ?

उत्तर:- सरकारी अधिकृत पोर्टल वरील माहिती असल्यामुळे अचूक आणि विश्वासार्ह आहे. जमिनीची सर्व माहिती एकाच डिजिटल  प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असल्यामुळे वेळेची बचत होते आणि घरबसल्या सर्व माहिती मिळण्यास मदत होते .

Mahabhumi LandStack वरील डिजिटल स्वाक्षरी नसलेले कागदपत्रे सरकारी योजनांसाठी व कामासाठी वापरता येतील का ?

उत्तर:-नाही. डिजिटल स्वाक्षरी नसलेले कागदपत्रे सरकारी सेवांचा लाभ व सरकारी योजनांसाठी उपयोगात आणता येत नाही.

Mahabhumi Landstack ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे ?


☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

अशाच शासकीय योजना, शेती, सरकारी योजना,नोकरभरती आणि  महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.

धन्यवाद !

Comments