🔹प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2026
1 एप्रिल 2016 पासून इंदिरा आवास योजना पुनर्रचित करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) लागू करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) राबवली जाते.
या योजनेअंतर्गत सरकारी अनुदानामार्फत गरीब व गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होते. घर बांधकाम सर्वेक्षण हे सरकारी सर्वेक्षणाच्या आधारावर केली जाते. स्थानिक पातळीवरील सरकारी कर्मचारी तुमच्या घरापर्यंत येऊन माहिती घेतात.
🔹प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यादी
सर्वप्रथम https://pmayg.dord.gov.in/netiayHome/home.aspx ह्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.
पोर्टल उघडल्यानंतर होमपेजवर वरती तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामधीलच एक Awaasoft नावाच्या पर्यायावर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून 3 पर्याय दिसतील त्यातील Report वरती click करा.
त्यानंतर खाली Scroll करा PMAY-G Report मध्ये Social Audit Report या नावाने एक Section दिसेल. त्यामधील Beneficiary Details For Verification यावरती क्लिक करा .
क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावयाची आहे.जसे की राज्य, तुमचा जिल्हा, तालुका आणि नंतर तुमच्या गावचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर वर्ष निवडा आणि तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे ते निवडा जसे की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, रमाई आवास योजना व इतर.
माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. थोड्याच वेळात तुमच्या गावातील पात्र लाभार्थी यादी, मंजूर अनुदानाची माहिती,व आर्थिक वितरण केलेल्या अनुदानाचे हफ्ते व किती हफ्ते वितरित झालेले आहेत,तसेच बांधकाम स्थिती, ह्याची सखोल माहिती दिसेल. माहिती save करण्यासाठी PDF download करा.
🔹अर्ज मंजूर आणि नामंजूर यादी
- Homepage वरील Awaasoft नावाच्या पर्यायावर क्लिक करा .क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील त्यापैकी Report वर Click करा .
- त्यानंतर PMAY-G Report वर Click करा खाली scroll करा तुम्हाला E-FMS Report Section मध्ये Beneficiaries registered,accounts frozen and verified यावर क्लिक करायचं आहे .
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावयाची आहे. तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तो पर्याय निवडा.जसे की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा,तालुका आणि तुमच्या गावचे नाव निवडायचे आहे. माहिती भरल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमच्या गावातील पात्र लाभार्थी यादी आणि नामंजूर झालेले अर्ज आणि प्रलंबित असणारे अर्जांची माहिती दिसेल.
- Download करण्यासाठी Download PDF यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये या यादीची PDF save होऊन जाईल.
🔹लाभार्थी माहिती कशी बघावी ?
वरील दोन्ही यादीपैकी कोणत्याही एका यादीत नाव असेल तर तुम्ही तुमची वयक्तिक माहिती अर्ज क्रमांकाद्वारे चेक करू शकता.जसे की Bank Details, तुमच्या अर्जाची माहिती, तुमचे घरकुल मंजूर झाले आहे का, अनुदान किती मंजूर झाले आहे ,किती अनुदानाचे हफ्ते वितरण झालेले आहेत ही सर्व माहिती तुम्ही तपासू शकता.
- सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाइट वर भेट दिल्यानंतर Homepage वर Stakeholders वर Click करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला IAY-PMAYG या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला Registration
Number/Beneficiary 🆔 या रकान्यात तुमचा अर्ज क्रमांक व CAPTCHA भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
🔹E -Kyc आणि survey करण्यासाठी मोबाईल ऍप
अधिकृत पोर्टलवर E-kyc आणि survey करण्यासाठी मोबाईल ऍप ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- मोबाईल ऍप डाऊनलोड करण्यासाठी Homepage वरील Aawasplus survey यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अधिकृत ऍप्लिकेशन ची 🖇️ लिंक वर click करून ऍप डाऊनलोड करू शकता. ह्या ऍप वर E-Kyc आणि सर्वे सारख्या सुविधा उपलब्ध असतील.
- केंद्र सरकारने नवीन सर्वेक्षणासाठी Aawas+ (आवास प्लस) ॲप आणि पोर्टल विकसित केले आहे. त्यामुळे नवीन सर्वेक्षणात नाव नोंदवण्यासाठी तुमच्या ग्रामसेवकाशी संपर्क साधावा.
🔹घरकुल योजनेसाठी पात्रता तपासणे.
- अधिकृत वेबसाइट ला भेट दिल्यानंतर homepage वरील मेनू मध्ये Am I Eligible? पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून सबमिट करा.
- PMAY-G अंतर्गत लाभार्थी निवडताना ग्रामीण भागातील घरांची स्थिती आणि कुटुंबाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती या सारख्या बाबीचा विचार केला जातो.
अधिकृत PMAY-G पोर्टलवरील पात्रता प्रश्नांमध्ये घर नसणे किंवा कच्च्या घरात राहणे , ग्रामीण भागात वास्तव्यास असणे , पक्के घर नसणे , कुटुंबाचे उत्पन्न , सरकारी नोकरी , वाहन जमीनधारणा , इत्यादी बाबीचा विचार केला जातो.
PMAY-G अंतर्गत घर बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून आर्थिक मदत केली जाते. योजनेची अंमलबजावणी AwaasSoft आणि आवास ऍप सारख्या डिजिटल प्रणालीद्वारे केली जाते .
🔹PMAY-G यादीत नाव नसेल तर काय करावे ?
जर तुमचे नाव यादीत दिसत नसेल, तर सर्वप्रथम तुमची पात्रता आणि संबंधित ग्रामपंचायत स्तरावरील नोंद तपासावी.
तुम्ही खालील ठिकाणी चौकशी करू शकता:
- ग्रामपंचायत कार्यालय
- ग्रामसेवक
- पंचायत समिती / ब्लॉक कार्यालय
- संबंधित ग्रामीण विकास विभाग
🔹अनुदान किती मिळते
मैदानी (साधारण) भागात घरकुलासाठी ₹ 120000 आणि डोंगरी दुर्गम भागात ₹ 130000 पर्यंत अनुदान थेट DBT द्वारे बँक खात्यात जमा केली जाते .
स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी ₹12000
आणि तसेच MNREGA रोजगार हमी योजनेतून आर्थिक मदत केली जाते.
कर्ज:- इच्छेनुसार पक्क्या घराच्या बांधकामासाठी 3% च्या कमी व्याजदर असणारे ₹70000 पर्यंत संस्थात्मक कर्ज घेऊ शकतात.
🔹आवश्यक कागदपत्रे
1.आधार कार्ड
2. MNREGA रोजगार हमी योजना कार्ड
3. बँक पासबुक
4. स्वच्छ भारत मिशन अभियान लाभार्थी कार्ड
🔹हेल्पलाईन क्रमांक
घरकुल योजनेसंदर्भात काहीही अडचण आल्यास toll free क्रमांकावरती संपर्क साधू शकता.
- हेल्पलाईन क्रमांक ग्रामीण भाग:- 1800-11-6446
- हेल्पलाईन क्रमांक शहरी भाग:- 1800-11-3377
- अधिकृत वेबसाइट ग्रामीण:-https://pmayg.nic.in
- अधिकृत वेबसाइट शहरी:-https://pmayurban.gov.in
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अशाच शासकीय योजना, शेती, सरकारी योजना, नोकरभरती आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.
धन्यवाद !!
Comments
Post a Comment