🔹पीएम किसान सन्मान निधी योजना
म्हणजेच ही योजना पुढील 5 वर्षे 2030- 2031 पर्यंत सुरू असणार आहे.ह्या योजनेकरीता केंद्र सरकारने 3.15 लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. 31 जुलै 2006 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे.
🔹Pm kisan yojna :- ह्या योजनेचा मुख्य उद्देश ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे , जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य या योजनेतून उपलब्ध करून देणे हा आहे .यामुळे शेतकऱ्यांना खरीप , रब्बी हंगामात पेरणी, खत औषधी बियाणे खरेदी करण्यास आर्थिक मदत होते.
ह्या योजनेला 7 वर्षे पूर्ण झालेली आहे.या योजनेची सुरवात फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपये प्रति हफ्ता याप्रमाणे 3 हफ्त्या मध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. आतापर्यंत 23 हफ्ते पूर्ण झाले असून 24 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शासनाने घातलेले निकष आहेत. पात्र शेतकऱ्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो.
PM किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर eKYC वेळेत पूर्ण करा, आधार बँकेशी लिंक ठेवा आणि अधिकृत वेबसाइटवरून तुमचे स्टेटस नियमित तपासत राहा. अधिकृत घोषणा झाल्यानंतर 24 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
🔹योजनेची पात्रता
▪️ स्वतःच्या नावावर जमीन आवश्यक आहे.
▪️ बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.
▪️शेतकरी हा अल्पभूधारक असावा .
▪️ जमीनधारक शेतकरी कुटुंब, पती ,पत्नी ,आणि अपत्य.
▪️PM - kisan योजनेंतर्गत लाभार्थ्यांची ओळख पडताळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.
▪️7/12 , व इतर जमिनीचे कागदपत्रे.
▪️ आधार कार्ड
PM KISAN योजनेसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.
🔹कोण अपात्र असेल या योजनेसाठी
▪️ सर्व संस्थात्मक जमीन धारक ( institutional land holders)
▪️माजी आणि विद्यमान मंत्री/राज्यमंत्री आणि लोकसभा सदस्य/राज्यसभा सदस्य/राज्य विधानसभा सदस्य/राज्य विधान परिषदेचे माजी/विद्यमान सदस्य, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतींचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष.
▪️केंद्र/राज्य सरकारच्या मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय युनिट्सचे, केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSEs) आणि शासनाच्या अखत्यारीतील संबंधित कार्यालय/स्वायत्त संस्थांचे सर्व कार्यरत किंवा सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित असलेले कर्मचारी.
▪️वरील प्रवर्गातील सर्व सेवानिवृत्त पेन्शनधारक ज्यांची मासिक पेन्शन रु. १०,०००/- किंवा जास्त आहे (मल्टी टास्किंग स्टाफ / वर्ग ४ / गट ड कर्मचारी सोडून).
▪️मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती
▪️व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत असलेले आणि व्यवसाय करणारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांसारखे व्यावसायिक असतील .
▪️ घटनात्मक पदावरील व्यक्ती ,आजी माजी
🔹PM किसान स्टेटस कसे तपासावे?
▪️अधिकृत वेबसाइट उघडा.
▪️Know Your Status पर्याय निवडा.
▪️नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.
▪️OTP पडताळणीनंतर अर्जाची सद्यस्थिती दिसेल.
🔹लाभार्थी यादी कशी पाहावी?
▪️PM किसान पोर्टलवर जा.
▪️Beneficiary List पर्याय निवडा.
▪️राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
▪️Get Report वर क्लिक करा.
▪️तुमच्या गावातील लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.
🔹अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site� ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.
धन्यवाद !!
Amazon वर सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा
या लेखात दिलेल्या शिफारस केलेल्या Amazon उत्पादनांची अधिक माहिती, सध्याची किंमत, ऑफर्स आणि ग्राहकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👉 Amazon वर उत्पादन पाहा आणि खरेदी करा
Comments
Post a Comment