Skip to main content

pink ई-रिक्षा योजना 2026 : महिलांना आता ई-रिक्षा खरेदीसाठी 40% अनुदान, शासनाचा मोठा निर्णय .

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार महिलांसाठी विविध उपक्रम, कल्याणकारी योजना राबवत असते ,महिला सशक्तीकरण, महिलांचा विविध क्षेत्रामध्ये समृद्ध करण्यासाठी व आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी सरकार चांगले प्रयत्न करताना दिसत आहे . यापूर्वीही शासनाने महिला कल्याणकारी योजना राबवल्या आहेत . महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास , व्हावा महिला स्वावलंबी व्हाव्यात या हेतूने सरकार प्रयत्न करत असते .

तसेच महिलांनी व्यवसाय, रोजगार क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घ्यावी, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, सुरक्षित प्रवास करता यावा , महिला आत्मनिर्भर होतील या दृष्टिकोनातून सरकारने 31 जुलै 2026 रोजी pink (गुलाबी )  ई-रिक्षा योजनेत महत्वाचे बदल करून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे .

🔹 ई-रिक्षा योजना अनुदान 

▪️या योजनेअंतर्गत यापूर्वी  ई-रिक्षा किंमतीच्या 20% अनुदानाऐवजी आता 40% शासन अनुदान राज्य सरकारमार्फत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

▪️सदर योजनेअंतर्गत ई-रिक्षाच्या किंमतीपैकी 60% आर्थिक भार लाभार्थ्याने उचलायचा आहे. त्यापैकी किमान 10% रक्कम स्वतःच्या भांडवलातून भरावी लागेल. उर्वरित रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी Partial Deferred Payment Facility अंतर्गत किंवा नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच मान्यताप्राप्त खाजगी बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून घेता येणार असल्यास शासनाने मान्यता दिली आहे.

🔹जुन्या लाभार्थ्यांनाही फायदा

▪️ सदर योजनेअंतर्गत यापूर्वी( pink)ई-रिक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा 20% शासन अनुदानाऐवजी 40% अनुदान शासन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

▪️(Pink) ई- रिक्षा योजनेमार्फत 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी 10000 लाभार्थी संख्या ऐवजी 5000 लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.

🔹अनुदान कोण वितरित करणार?

या योजनेतील अनुदानाचे वितरण महिला व बाल विकास आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयामार्फत केले जाणार आहे.

🔹लाभार्थी संख्या

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10,000 वरून 5,000 निश्चित करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील 8 जिल्ह्यांतील प्रमुख शहरांसाठी लागू राहणार आहे.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

पिंक ई-रिक्षा योजनेतील हा बदल राज्यातील महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. अनुदानात झालेली वाढ महिलांना कमी आर्थिक भारात ई-रिक्षा खरेदी करण्यास मदत करेल आणि स्वयंरोजगाराला चालना मिळेल. पात्र महिलांनी शासनाकडून पुढे जाहीर होणाऱ्या अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष ठेवावे.




अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.

धन्यवाद !!

Amazon वर सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा
या लेखात दिलेल्या शिफारस केलेल्या Amazon उत्पादनांची अधिक माहिती, सध्याची किंमत, ऑफर्स आणि ग्राहकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉Amazon वर उत्पादन पाहा आणि खरेदी करा



Comments