Skip to main content

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2026: पात्रता, फायदे, आजारांची यादी व अर्ज प्रक्रिया ||

नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे फायदे काय आहेत, योजनेसाठी पात्रता काय आहेत,या योजनेचा लाभ काय मिळेल हे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .

आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.गंभीर आजार किंवा मोठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डळमळीत होते. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या परिवाराला वैद्यकीय खर्च न परवडण्यासारखा आहे .अशा परिस्थितीमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला उपचार घ्यायला अवघड व त्रासदायक ठरते ,परिणामी खर्चाअभावी चांगले उपचार घेऊ शकत नाही.यामुळे रुग्णाला गंभीर आजाराला सामोरे जावे लागते .अशा परिस्थितीची जाणीव लक्षात घेता शासनाने नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) सुरू केलेली आहे.

ही योजना राज्यातील पात्र कुटुंबांना शासनमान्य रुग्णालयांमध्ये कॅशलेस (रोखरहित) उपचाराची सुविधा देते.
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेचा विस्तार काळानुसार वाढवण्यात आला असून अनेक विशेष उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. 

🔹महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. या योजनेची सुरुवात 2012 मध्ये राजीव गांधी जीवंदायी आरोग्य योजना या नावाने झाली होती. सुरवातीला ही योजना 8 जिल्ह्यामध्ये  सुरू करण्यात आली होती त्यानंतर  21 नोव्हेंबर 2013 या वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ह्या योजनेचा विस्तार करण्यात आला.1 एप्रिल 2017 पासून या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना शासनमान्य रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ कॅशलेस पद्धतीने मिळतो. 

🔹योजनेची प्रमुख उद्दिष्टे 

▪️आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
▪️गंभीर आजारांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी करणे.
▪️नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
▪️गरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करणे.
▪️ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे.
▪️ महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी  आरोग्य संरक्षण उपलब्ध.

🔹योजनेसाठी पात्रता

सुरवातीला ही प्रमुख आरोग्य योजना फक्त अल्प उत्पन्न असणाऱ्या गटासाठीच सुरवात करण्यात आली होती . त्यानंतर वेळोवेळी इतर गटांचाही समावेश करण्यात आला होता.

नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जुलै 2023 रोजी शासन निर्णय पारित केल्यानुसार ,राज्यातील सर्व कुटुंबासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू असेल.

गट अ :- 

▪️ पिवळे,केसरी,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना, रेशन कार्ड असणारी कुटुंबे 

गट ब :- 

▪️पांढरे रेशनकार्ड धारक शेतकरी /निमशासकीय/शासकीय कर्मचारी .
▪️ ज्यांच्याकडे कोणतेही रेशनकार्ड नाहीये परंतु महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( Domicile certificate)आहेत असे नागरिक.

गट क :- 

▪️ शासकीय, निमशासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी .
▪️ शासकीय, निमशासकीय मान्यताप्राप्त अनाथाश्रमातील मुले.
▪️ शासकीय क्षेत्रामधील काम करणाऱ्या महिलावर्ग , शासकीय मान्यताप्राप्त आश्रमातील महिला.
▪️ शासकीय ,निमशासकीय मान्यताप्राप्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक 
▪️ शासनमान्य ,नोंदणीकृत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य 
▪️ शासनमान्य नोंदणीकृत बांधकाम कामगार वर्ग.

गट ड :- 

▪️ महाराष्ट्रातील राष्टीय महामार्गावर किंवा कोणत्याही रस्त्यावर अपघात झालेले अपघातग्रस्त व्यक्ती ( महाराष्ट्रातील/महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्ती)

गट इ :- 

महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषावरील 865 गावातील रेशनकार्ड धारक कुटुंबे .

🔹योजनेचे विशिष्ट लाभ 

▪️गट अ ते गट इ साठी ( गट ड सोडून ) 34 विशेषज्ञ सेवांतर्गत द्वितीय व तृतीय प्रकारच्या 1356 उपचाराचा लाभ.

▪️ गट ड साठी:- 184 उपचारांचा आरोग्य लाभ पॅकेज.

▪️सरकारी दवाखान्यासाठी राखीव उपचार:- गट अ ते इ दोन्ही योजनांतर्गत 119 आरोग्य उपचार पॅकेज .

▪️शस्त्रक्रियेनंतर पाठपुरावा :- गट अ ते इ  दोन्ही योजनांसाठी 262 आरोग्य उपचार पॅकेज.

🔹आरोग्य विमा संरक्षण 

▪️गट अ ते गट इ  दोन्ही योजनांतर्गत 5 लाख रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष.

▪️गट ड साठी :- प्रति व्यक्ती प्रति वर्षी 1 लाख रुपये.


🔹आवश्यक कागदपत्रे:- 

▪️आधार कार्ड 
▪️रेशन कार्ड 
▪️ महाराष्ट्र रहिवासी दाखला ( Domicile certificate)
▪️ पासपोर्ट फोटो 
▪️ पॅन कार्ड 
▪️ केंद्र सरकार/ राज्य सरकारने जारी केलेलं ज्येष्ठ नागरिक कार्ड
▪️ मतदान कार्ड 
▪️शाळा /विद्यालय ओळखपत्र 
▪️आयुष्मान कार्ड 

  🔹 आरोग्य पॅकेज मधील मिळणारे लाभ 

आरोग्य पॅकेज मध्ये सर्व सुविधांचा लाभ देण्यात आला आहे.आरोग्य पॅकेज हे सर्वसमावेशक असून , रुग्णांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होतात.

▪️ ऑक्सिजन,X ray, अतिदक्षता विभाग(ICU) सुविधांसाठीचे शुल्क.
▪️ शस्त्रक्रियेची उपकरणे, औषधे, मास्क,single use करण्या सारख्या वस्तू .
▪️ रक्त संक्रमणाचा खर्च ( राज्य शासन निकषानुसार) 
▪️ वॉर्डमधील बेड चा खर्च .
▪️ शस्त्रक्रिया तज्ञ , 
▪️या आरोग्य पॅकेज मध्ये  रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंत सर्व इतर खर्चाचे तपशील दिलेले आहेत .

🔹उपचारांचा खर्च कसा केला जाणार?

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या उपचारांचा खर्च प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकार उचलणार आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून दिला जाणार असून, तो अनुदानित सर्वसाधारण (General), अनुसूचित जाती उपयोजना (SCP) आणि अनुसूचित जमाती उपयोजना (TSP) या निधीमधून खर्च केला जाईल.

या योजनेमुळे रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळतील.

🔹अर्ज कसा करावा ?

जवळच्या सरकारी रुग्णालयात, महाआरोग्य मित्र केंद्रात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट द्या.

🔹महात्मा फुले योजना हेल्पलाईन क्रंमाक 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांक :- 155327, टोल फ्री 18002332200

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆



अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.

धन्यवाद !!

Amazon वर सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा
या लेखात दिलेल्या शिफारस केलेल्या Amazon उत्पादनांची अधिक माहिती, सध्याची किंमत, ऑफर्स आणि ग्राहकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉Amazon वर उत्पादन पाहा आणि खरेदी करा



Comments