Skip to main content

MAHA ID 2026: महा आयडी कसा काढायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती |

🔹MAHA 🆔 2026:- 

नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र राज्य सरकार दरवेळी काही ना काही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून
देत असते.अशातच एक नवीन सुविधा डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे राज्यातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून
दिली आहे. ह्या नवीन सुविधेच नाव आहे MAHA 🆔 .आजच्या लेखात आपण महा आयडी काय आहे,त्याचे फायदे काय आहेत,उपयोग काय होईल आणि महा आयडी साठी कसा अर्ज दाखल करावा हे सविस्तर ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

🔹MAHA 🆔 म्हणजे काय ?

Maha 🆔 म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेला एक डिजिटल उपक्रम आहे.MAHA 🆔 एक डिजिटल ओळख प्रमाणपत्रासारखे काम करते की जे तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी योजनाचे डिजिटल प्रवेशद्वार प्रदान करते. या 🆔 च्या माध्यमातून नागरिकांना सरकारी वेबसाईट किंवा ॲपवर एकाच ओळखीने विविध सेवा योजना व अर्ज प्रक्रियांचा वापर करता येऊ शकतो.

🔹MAHA 🆔 चे फायदे काय आहेत.

▪️MAHA 🆔 हे राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक डिजिटल ओळखप्रमाणपत्र आहे.

▪️ ह्या MAHA 🆔 द्वारे राज्यातील शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.

▪️सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद.

▪️ सुरक्षित  पडताळलेली एकसंध माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.

▪️ नागरिकांना विविध योजनेचे अर्ज भरताना समान माहिती वारंवार भरण्याची गरज नाही.

▪️ महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजना व सेवांसाठी एकच ओळख प्रमाणपत्र.

▪️नागरिकांच्या माहितीवर त्यांचे अधिकारी असतील ,नागरिकांची माहिती कोण ,कशासाठी , कोणत्या
उद्देशासाठी वापरू शकतो हे नागरिक स्वतः ठरवू शकतो .


🔹MAHA 🆔 कशासाठी आवश्यक आहे?

दिवसेंदिवस हे आधुनिक जग डिजिटल होत चालले आहे . आजच्या युगात दिवसेंदिवस डिजिटल सेवा उपलब्ध होत राहतात ,यामुळे वेळेची बचत होऊन सरकारी कामे,सेवा जलद गतीने पार पडतात.डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे सरकारी योजनांच्या सेवांचा लाभ घेणे अगदी सुलभ झाले आहे.
आज अनेक सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. विविध योजनांसाठी अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे, सरकारी सेवांचा लाभ घेणे किंवा अर्जाची स्थिती तपासणे यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या पोर्टलचा वापर करावा लागतो .

डिजिटल ओळख प्रणालीचा मुख्य उद्देश नागरिकांची माहिती व्यवस्थित जोडणे आणि सरकारी सेवांचा वापर अधिक सोपा करणे हा आहे.यामुळे भविष्यात सरकारी सेवांचा लाभ घेताना वारंवार माहिती भरण्याची गरज कमी होऊ शकते.
वारंवार समान माहिती सादर करण्याची गरज कमी होऊ शकते.

🔹MAHA 🆔 साठी कोणती कागदपत्रे लागतात?

▪️ आधार कार्ड 
▪️ आधार कार्ड क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक 
▪️ रेशनकार्ड 
▪️ Digilocker account (असल्यास)

🔹 MAHA 🆔 साठी अर्ज कसा करावा.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या त्यानंतर पोर्टल ओपन होईल.
▪️ त्यानंतर तुम्हाला notification दिसेल "MAHA 🆔 साठी अर्ज करा"असे किंवा मेनू वर क्लिक करून लॉगिन करा.
▪️ नागरिक लॉगिन हा पर्याय निवडा.
▪️ आधार क्रमांक भरा.
▪️ त्यानंतर OTP (one Time password ) तुमच्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे येईल तो भरा.
▪️ तुमची वयक्तिक माहिती भरा, alternate मोबाईल क्रमांक,email 🆔, व इतर.
▪️ माहिती तपासून सबमिट बटनावर क्लिक करा.
▪️ नंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे MAHA 🆔 डाउनलोड करण्यासाठी माहिती दिली जाईल.

🔹Digilocker वरून MAHA 🆔 काढणे.

▪️Play store वरून Digilocker ॲप डाऊनलोड करा .digilocker ॲप उघडा .
▪️issued documents वरती क्लिक करा किंवा search document वरती क्लिक करा .तिथे
Mahasarthi अथवा Family 🆔 सर्च करा .
▪️दिलेली आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा .
▪️ त्यानंतर fetch documents वरती क्लिक करून Maha 🆔 डाउनलोड करा .

🔹E-kyc अपडेट कशी करावी ?

▪️अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
▪️ नागरिक लॉगिन ह्या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा.
▪️ लॉगिन केल्यानंतर "My Information " ह्या पर्यायावर क्लिक करा.
▪️ त्यानंतर तुम्हाला update E-kyc नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
▪️ आधार कार्ड क्रमांक टाकून accept and send OTP वर क्लिक करा.
▪️ OTP भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

🔹Maha 🆔 कोणाला आवश्यक आहे ?

▪️MAHA 🆔 महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक असे डिजिटल ओळख प्रमाणपत्र आहे.
▪️विशेष करून ज्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नवीन योजनांचा लाभ घ्यायचा आहे.
▪️ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे .
▪️ज्या लाभार्थ्यांना सरकारी कागदपत्रे, सरकारी सेवांचा लाभ, घ्यायचा आहे.

🔹MAHA 🆔 बद्दल:- 

महत्वाची सूचना :- MAHA 🆔 ही एक डिजिटल ओळख असून विविध शासकीय योजना व सेवा यांकरिता उपयोगात येते.
आधार कार्ड आणि MAHA 🆔 हे दोन्ही वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरले जातात. त्यांचे स्वरूप आणि कार्यपद्धती ही वेगवेगळी आहे.”

▪️ अर्ज करताना अधिकृत वेबसाइटलाच भेट द्या .
▪️ OTP कोणालाही शेअर करू नका .
▪️ खाजगी माहिती जसे की क्रेडिट कार्ड PIN DEBIT CARD PIN, ATM PIN इतर कोणालाही शेअर करू नका .
▪️ फसव्या कॉलपासून सावध रहा .


☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

अशाच शासकीय योजना, शेती, नोकरभरती,तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.

धन्यवाद !!

Comments