नमस्कार शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण गोबरधन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, ह्या योजनेचे काय फायदे आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना कसे आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल,भारताच्या अर्थव्यवस्थेवर या योजनेचा काय परिणाम होईल हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
🔹गोबरधन योजना 2026
केंद्र सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजेच CBG क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ₹23,731 कोटींच्या तरतुदीसह ‘गोबरधन’ या राष्ट्रीय परिपत्रक जैवऊर्जा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना केवळ बायोगॅस निर्मिती पुरती मर्यादित नसून शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण, शहरी सेंद्रिय
कचरा आणि इतर जैविक संसाधनांचे स्वच्छ इंधन, सेंद्रिय खत आणि ग्रामीण उत्पन्नामध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
गोबरधन योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा एक प्रमुख उद्देश भारतातील CBG ( compressed biogas) उत्पादनात जवळपास दहा पट वाढ घडवून आणणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे हा आहे.
🔹गोबरधन योजना म्हणजे काय?
गोबरधन ही भारतातील सेंद्रिय संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करून स्वच्छ ऊर्जा आणि चक्रीय जैवअर्थव्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली राष्ट्रीय योजना आहे.भारतामध्ये शेती , पशुपालन आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणा वर सेंद्रिय कचरा निर्माण होतो .
शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण, अन्नकचरा आणि इतर जैविक पदार्थांचा योग्य वापर न झाल्यास त्यातून पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात.
गोबरधन योजनेच्या माध्यमातून याच जैविक संसाधनांचा उपयोग करून CBG (compressed biogas) तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.यामुळे एका बाजूला कचऱ्याचे व्यवस्थापन होईल, तर दुसऱ्या बाजूला त्यापासून इंधन आणि सेंद्रिय खत तयार करता येईल.त्यामुळे ‘कचऱ्यापासून संपत्ती ’ निर्माण करण्याच्या संकल्पनेला चालना मिळू शकते.
🔹CBG म्हणजे काय?
CBG म्हणजे (Compressed Biogas) अर्थात संकुचित बायोगॅस.
शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण, शहरी सेंद्रिय कचरा आणि इतर जैववस्तुमानापासून बायोगॅस तयार केला जाऊ शकतो . या बायोगॅसचे शुद्धीकरण करून त्याला संकुचित केल्यानंतर CBG तयार होते.
PIBच्या माहिती नुसार CBG हे रासायनिकदृष्ट्या नैसर्गिक वायूच्या समतुल्य आहे. त्यामुळे त्याचा वापर वाहतूक, घरगुती , औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करण्याची क्षमता आहे.
🔹गोबरधन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
गोबरधन योजनेमागे अनेक महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
▪️शेतकरी आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी नवीन उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे.
▪️ सेंद्रिय कचऱ्याचा वापर, शेती उपयोगी व पर्यावरण रहित, ऊर्जा तयार करण्यासाठी करणे.
▪️ स्वदेशी सेंद्रिय उत्पादनावर भर देणे.
▪️CBG प्रकल्पासाठी वित्तपुरवठा सुलभ करणे.
▪️शेतीतील अवशेष आणि जनावरांच्या शेणाचा उत्पादक वापर करणे.
▪️CBG क्षेत्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आणणे.
▪️नवीन CBG आधारित खाजगी व सरकारी उद्योगाला चालना देणे.
▪️ देशाच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करणे.
▪️देशातील युवांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणे .
🔹शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी संधी :-
गोबरधन योजनेमध्ये शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण आणि इतर जैविक संसाधनांचा उत्पादक वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.त्यामुळे CBG प्रकल्पांच्या आसपास कच्चा माल संकलन, वाहतूक, प्रकल्प संचालन आणि सेंद्रिय खत उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होऊ शकतात.शेतकरी , कच्चा माल संकलक, सहकारी संस्था आणि ग्रामीण उद्योजकांसाठी नवीन उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
यामुळे ग्रामीण भागात कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याची संकल्पना मजबूत होऊ शकते. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सुधारण्यास , गावातील लोकांना रोजगाराची व व्यवसायाची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. यामुळे रासायनिक शेतीकडे न वळता शेतकरी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देतील.
मेंढी पालन, दूध उत्पादन, गायी म्हशी पालन, कोंबडी पालन या व्यवसाय अधिक नवीन निर्माण होतील.परिणामी सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढल्यास जमिनीतील सेंद्रिय घटक सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे .
🔹ऊर्जा सुरक्षेला मिळणार चालना
वाहतूक, घरगुती , औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये भारताची नैसर्गिक वायूची मागणी वाढत
आहे.
CBG चे देशांतर्गत उत्पादन वाढल्यास या मागणीतील काही भाग नवीकरणीय वायूद्वारे पूर्ण करण्यास
मदत होऊ शकते.यामुळे ऊर्जा कमतरता मजबूत करण्यास आणि आयात केलेल्या जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी
करण्यास मदत होऊ शकते.त्यामुळे गोबरधन योजना ही ग्रामीण विकासासोबतच भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ही महत्त्वाची ठरू शकते.
🔹सेंद्रिय खतांच्या मूल्यसाखळीला चालना
CBG क्षेत्रा चा फायदा केवळ इंधन उत्पादना पुरता मर्यादित नाही .गोबरधन योजनेमध्ये FOM आणि LFOM यांच्या अधिक उत्पादन, मूल्यवर्धन आणि वापराला ही
प्रोत्साहन देण्यात आले आहे.यामुळे CBG उत्पादनासोबत सेंद्रिय खतांची मूल्यसाखळी विकसित होण्यास मदत होऊ शकते.
🔹गोबरधन योजनेचे 6 प्रमुख घटक
▪️खात्रीशीर CBG खरेदी
CBG उत्पादकांना निश्चित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खरेदीची व्यवस्था करण्यात येणार आहे. CBG दायित्वासाठी 2026-27 मध्ये 3%, 2027-28 मध्ये 4% आणि 2028-29 पासून 5% उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
▪️ स्थिर CBG दर
योजनेअंतर्गत ₹2,110 प्रति MMBTU असा प्रशासकीय CBG दर निश्चित करण्यात आला आहे. ही
किंमत निर्धारण चौकट किमान 10 वर्षांसाठी असल्याचे PIBच्या माहितीत नमूद आहे.
▪️भांडवली सहाय्य
पात्र ग्रीनफिल्ड CBG प्रकल्पांना स्थापित क्षमतेच्या प्रति टन प्रति दिन (TPD) ₹2 कोटीं पर्यंत भांडवली
सहाय्य मिळू शकते. पात्र ब्राउनफिल्ड प्रकल्पांनाही याचा लाभ मिळू शकतो .
▪️पाइपलाइन पायाभूत सुविधा
CBG प्रकल्पांना मुख्य पाइपलाइन आणि City Gas Distribution नेटवर्कशी जोडण्यासाठी पाइपलाइन पायाभूत सुविधांना सहाय्य दिले जाणार आहे.
▪️पत हमी समर्थन
पात्र MSME आधारित CBG प्रकल्पांना संस्थात्मक कर्जपुरवठा सुलभ करण्यासाठी पत हमी यंत्रणा
उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे वित्तपुरवठ्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होऊ शकते.
▪️CBG Ecosystem Challenge Fund
जिल्हा स्तरावर CBG परिसंस्था विकसित करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. यामध्ये कच्च्या
मालाचे मॅपिंग, संकलन पायाभूत सुविधा , तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा , सेंद्रिय खताचे मूल्यवर्धन आणि
क्षमता बांधणीला सहाय्य केले जाणार आहे.
🔹CBG क्षेत्रासाठी सरकारची आधीची तयारी
CBG क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने या पूर्वी ही विविध उपक्रम राबवले आहेत. या मध्ये SATAT,Market Development Assistance (MDA), Biomass Aggregation Machinery (BAM), Pipeline Infrastructure Development (DPI) तसेच National Bioenergy Programme अंतर्गत Central Financial Assistance यांचा समावेश आहे.
PIBच्या माहितीनुसार, या उपक्रमांमुळे देशात 200 हून अधिक CBG प्रकल्पांची उभारणी शक्य झाली आहे. तसेच CBG उत्पादन व खरेदी व्यवस्था आणि सेंद्रिय खत मूल्यसाखळी विकसित करण्यास मदत झाली आहे.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🔹अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.
Comments
Post a Comment