शेतकऱ्यांनो शेतजमिनीतील बदलांची माहिती मिळवा आता SMS आणि E-mail वर भूमी अभिलेख पोर्टल वर नवीन अपडेट !
🔹E-Sandesh 2026
नमस्कार शेतकरी मित्रांनो , दरवेळी प्रमाणे आम्ही शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी घेऊन आलो
आहोत.
राज्यातील सर्व शेतजमीन मालकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे .महाराष्ट्रातील सर्व जमीनधारकासाठी भूमी अभिलेख विभागाचे महाभूमी पोर्टल वरून एक नवीन अपडेट येत आहे.जमिनी संबंधित 7/12 उतारा 8अ ,फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, ई-हक्क, ई-रेकॉर्ड, आणि इतर अनेक सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ,तसेच भूमी अभिलेख नव्यानेही काही अपडेट घेऊन येत राहते.
नुकतेच भूमी अभिलेख विभागाने पोर्टल वरती एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.ही सुविधा राज्यातील प्रत्येक शेतजमीन असणाऱ्या शेतमालकांसाठी तसेच मालमत्ता धारकांसाठी उपलब्ध असेल.
शेतजमीन मालकी हक्क , सातबारा , फेरफार , 8अ, प्रॉपर्टी कार्ड, ई-हक्क,ई-रेकॉर्ड यासंबधीत आणि इतर अनेक सेवा बद्दल सविस्तर माहिती e-mail, आणि संदेश(text message) वरती E-sandesh द्वारे सहज उपलब्ध होणार आहेत.
🔹भूमि अभिलेख बद्दल माहिती
भूमि अभिलेख म्हणजे एखाद्या जमिनीशी संबंधित अधिकृत नोंदी.यामध्ये जमिनीचा सर्वे किंवा गट क्रमांक, क्षेत्रफळ, खातेदाराचे नाव, हक्क आणि इतर संबंधित माहितीचा समावेश असतो .महाराष्ट्राच्या महाभूमी पोर्टलवर नागरिकांना विविध भूमि अभिलेख सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.अधिकृत पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरी युक्त 7/12, 8अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, ई-रेकॉर्ड, महाभूनकाशा , ई-हक्क आणि भूलेख यांसारख्या सुविधा दिल्या आहेत.
🔹E-Sandesh साठी अर्ज कसा करावा ?
वरील दिलेल्या लिंकवर 🖇️ क्लिक करा .भूमी अभिलेख पोर्टल वर नोंदणी कृत मोबाईल नंबर
टाका .तिथे CAPTCHA येईल तो भरा .
▪️नंतर पोर्टल नवीन टॅब वरती उघडेल.तुमचा जिल्हा , तालुका,गावाचे नाव निवडा.त्यानंतर सर्वेक्षण
क्रमांक/गट नंबर/प्लॉट क्रमांक निवडा .
▪️त्या नंतर e-sandesh चे premium subscription (सेवेची सदस्यता ) ची पूर्ण माहिती दिलेले
असेल ते तुमच्या सोयीनुसार निवडा .
▪️पेमेंट पद्धत निवडा तुम्ही कशावरून पेमेंट करणार आहात. जसे की upi द्वारे किंवा नेट बँकिंग,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड यांसारखे पर्याय उपलब्ध असू शकतात.यातील कोणतीही एक पद्धत निवडा त्यानंतर पेमेंट पूर्ण करा .
▪️सुरक्षित व्यवहार झाल्यानंतर तुम्ही पेमेंट केलेल्या व्यवहाराची पावती (invoice) डाऊनलोड करा .
▪️हे सर्व झाल्या नंतर तुम्हाला संदेश सुविधेचा लाभ मिळण्यास सुरवात होईल. महत्त्वपूर्ण जमीन नोंदी
बदल, फेरफार बदल ,अशा अनेक सुविधांची माहिती थेट तुमच्या मोबाईल SMS व e-mail वरती notification प्राप्त होईल.
▪️नूतनीकरण कालबाह्य होण्याअगोदर तुम्हाला सूचित केले जाईल. नूतनीकरण प्रक्रिया एकदम सोपी आहे, नूतनीकरणासाठी फक्त पेमेंट करण्याची आवश्यकता आहे.
नूतनीकरणासाठी (renew) करण्यासाठी त्याच पोर्टलचा वापर करता येतो .
🔹E-sandesh चे महत्व
E-sandesh हे एक महत्वपूर्ण जमीन नोंदी , फेरफार बदल , प्रॉपर्टी कार्ड याबदल तुम्हाला एका संदेशांद्वारे माहिती देणार स्रोत आहे.आजच्या आधुनिक काळात सर्व गोष्टी ऑनलाइन प्रणाली द्वारे उपलब्ध आहेत. ह्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे वेळेची बचत व तात्काळ माहिती उपलब्ध होते.भूमी अभिलेख विभागाने E-sandesh नावाने एक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीबद्दल जमीन नोंदी ,व इतर गोष्टीची माहिती घरबसल्या मोबाईल वर समजण्यास मदत होणार आहेत .
यामुळे भविष्यातील जमीन नोंदीच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यास मदत होणार आहेत.शेतकऱ्यांना व जमीनधारकांना जमिनीच्या नोंदीबद्दल व इतर अनेक जमी न संबंधित व्यवहाराबद्दल ,जमीन नोंद झाल्यानंतर व इतर बदला संबंधित जसे घडतील तश्या सरकारी पोर्टल वरून अचूक पूर्वसूचना मिळेल. बरेच शेतकऱ्यांच्या चुकीच्या जमीन नोंदी बद्दल ,व गैरव्यवहाराबद्दल शेतकऱ्यांना बराच वेळ माहितीच
नसते त्यामुळे कायदेशीर मार्ग अवलंब करायला व चुकीच्या नोंदी दुरुस्त करायला खूप विलंब होतो.
त्यामुळे जमीनधारकाला व शेतकऱ्याला नाहक खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते .भूमी अभिलेख विभागाने ही संदेश सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे तुम्हाला अचूक माहिती व वेळेवर माहिती उपलब्ध होईल .शेतजमीन ही शेतकऱ्याची अत्यंत महत्त्वाची मालमत्ता असते. त्यामुळे जमिनीच्या नोंदीं बाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.अनेक वेळा जमीनधारक आपल्या 7/12 उताऱ्यावर किंवा इतर जमीन नोंदींवर नियमितपणे लक्ष ठेवत नाहीत. एखादा फेरफार किंवा नोंदीतील बदल झाल्यानंतर त्याची माहिती उशिरा मिळाल्यास संबंधित बाब तपासण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो .
अशा परिस्थितीत जमीनविषयक बदलांची सूचना वेळेवर मिळणे फायदेशीर ठरू शकते. सूचना मिळाल्यानंतर जमीनधारक संबंधित नोंद तपासू शकतो आणि गरज असल्यास संबंधित कार्यालय किंवा अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधू शकता.ही SMS सुविधा Internet शिवाय 24 तास उपलब्ध असेल .
🔹जमिनीच्या नोंदी नियमित तपासणे का आवश्यक आहे?
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा 7/12 उतारा , 8अ उतारा आणि फेरफार नोंदी वेळोवेळी तपासणे
महत्त्वाचे आहे.जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित माहिती , क्षेत्रफळ, खातेदाराचे नाव किंवा इतर नोंदींमध्ये काही
चुकीची माहिती आढळल्यास ती बाब दुर्लक्षित न करता संबंधित अधिकृत विभागाकडे चौकशी करावी .
E-Sandesh ही सूचना देणारी सुविधा आहे; ती स्वतः हून जमीन नोंदीती ल कोणतीही चूक दुरुस्त करणारी सेवा नाही . त्यामुळे सूचना मिळाल्यानंतर संबंधित नोंद अधिकृत पोर्टलवर तपासणे आवश्यक आहे.
📍महत्त्वाची सूचना:-
जमिनीशी संबंधित कोणतेही ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटच वापरा. अनोळखी व्यक्ती ने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका . OTP, UPI PIN, ATM PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका .तसेच E-Sandesh कडून आलेली सूचना ही माहिती देण्यासाठी असते. जमीन नोंदीमध्ये प्रत्यक्ष काय बदल झाला आहे, हे अधिकृत भूमी अभिलेख नोंद तपासूनच निश्चित करावे.
🔹सदस्यता संपल्या नंतर काय करावे?
E-Sandesh ची सदस्यता विशिष्ट कालावधीसाठी असल्यास ती कालबाह्य होण्यापूर्वी नूतनीकरणाची आवश्यकता असू शकते. उपलब्ध अधिकृत पर्यायांनुसार नूतनीकरण करता येते.
नूतनीकरण करण्यापूर्वी संबंधित योजनेचा कालावधी , शुल्क आणि अटी अधिकृत पोर्टलवर तपासाव्यात.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.
Comments
Post a Comment