Skip to main content

AgriStack Digital Crop Survey (DCS MH) 2026 : पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत मोठे बदल; शासनाचा नवीन GR जारी.


दिनांक : 3 ऑगस्ट 2026

नमस्कार मित्रांनो,राज्यात ॲग्रिस्टॅक (AgriStack) योजना राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने Digital Crop Survey (DCS MH) च्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणारा नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार पीक पाहणी, पीक नोंदणी, पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती, त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच मानधनाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

🔹शासन निर्णयाचा उद्देश

राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविताना यापूर्वी Digital Crop Survey सह इतर घटकांच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या Digital Agriculture Mission अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या Central Digital Crop Survey (DCS MH) प्रणालीशी सुसंगतता राखण्यासाठी तसेच पीक पाहणी नोंदणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

🔹Digital Crop Survey (DCS MH) कार्यपद्धती

▪️पीक नोंदणीची सुरुवात

हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणी सुरू केली जाईल. पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP द्वारे केली जाईल. तसेच संबंधित मोबाईल उपकरणाचे IMEI Binding करण्यात येईल.

▪️Owner Plot म्हणजे काय?

प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक शेतजमिनी असतात. शेतकऱ्याच्या एका ठिकाणी असलेल्या शेतजमिनीला "Owner Plot" असे संबोधण्यात येईल. त्या Owner Plot मध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद केली जाईल. हंगामी पिकांचा माहिती संच तयार करताना पीक पाहणी Owner Plot प्रमाणे करावी लागेल.

▪️100 टक्के पीक पाहणी

प्रत्येक गावातील 100 टक्के Owner Plot ची पीक पाहणी करणे ही ग्राम महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. पीक पाहणी गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आत जाऊन करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

🔹तहसीलदार स्तरावरील पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती

तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 Owner Plot साठी पुढीलपैकी उपलब्ध व्यक्तींपैकी एकाची पीक पाहणी सहाय्यक म्हणून नियुक्ती करतील.

▪️कोतवाल
▪️ग्राम रोजगार सेवक
▪️आशा सेविका
▪️महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM) कर्मचारी
▪️CSC चालक
▪️मानधन तत्त्वावरील इतर कर्मचारी
▪️उपलब्ध नसल्यास MyBharat पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक

एका सहाय्यकाकडे जास्तीत जास्त 1500 Owner Plot ची जबाबदारी देण्यात येईल. 1500 पेक्षा कमी Owner Plot असलेल्या गावासाठीही स्वतंत्र सहाय्यक नियुक्त केला जाईल. 1500 पेक्षा जास्त Owner Plot असलेल्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक सहाय्यक नेमता येतील. कोणत्याही परिस्थितीत एका सहाय्यकाकडे 1500 पेक्षा जास्त Owner Plot चे काम दिले जाणार नाही. सहाय्यकांची नियुक्ती केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लॉगिनद्वारे करण्यात येईल.

🔹पीक पाहणी सहाय्यकांची जबाबदारी

शासन निर्णयानुसार पीक पाहणी सहाय्यकांनी हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक नोंदणी सुरू करावी. गावातील 100 टक्के Owner Plot ची पीक पाहणी सहाय्यकांनी करावी. सहाय्यकांनी नोंदविलेल्या सर्व नोंदींची पडताळणी ग्राम महसूल अधिकारी करतील.

जर ग्राम नमुना-12 मध्ये प्रतिबिंबित झालेल्या पीक नोंदीत काही त्रुटी आढळल्यास शेतकरी मंडळ अधिकाऱ्यांना अर्ज करून माहिती देतील. त्यानंतर मंडळ अधिकारी स्थळ पंचनामा करून मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदीत दुरुस्ती करतील.
ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पीक नोंद नामंजूर केल्यास ती पुन्हा सहाय्यकांकडे ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध होईल. दोन वेळा नाकारलेल्या पीक नोंदींची पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल अॅपद्वारे नोंद करतील.

🔹सहाय्यकांना मिळणारे मानधन

शासन निर्णयानुसार पीक पाहणी सहाय्यकांना हंगामनिहाय पुढीलप्रमाणे मानधन देण्यात येईल.

निव्वळ पीक (Single Crop) : प्रति Owner Plot ₹10

मिश्र पीक (Mixed Crop) : प्रति Owner Plot ₹12

हे मानधन सहाय्यकांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. यासाठी कृषी विभागाकडून SNA-SPARSH प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

🔹शासन निर्णयातील इतर बाबी

14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयातील इतर सर्व अटी व शर्ती यथास्थित कायम राहतील. तसेच हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून तो डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

3 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार Digital Crop Survey (DCS MH) च्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये पीक नोंदणीची प्रक्रिया, Owner Plot संकल्पना, पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती, त्यांची जबाबदारी आणि मानधन याबाबत सविस्तर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयातील सुधारित कार्यपद्धती संबंधित अधिकारी आणि पीक पाहणी प्रक्रियेत सहभागी व्यक्तींनी पालन करावयाची आहे.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆




अशाच शासकीय योजना, शेती, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.

धन्यवाद !!

Amazon वर सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा
या लेखात दिलेल्या शिफारस केलेल्या Amazon उत्पादनांची अधिक माहिती, सध्याची किंमत, ऑफर्स आणि ग्राहकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉Amazon वर उत्पादन पाहा आणि खरेदी करा


Comments