डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:-
परंतु शेती ही निसर्गावरती अवलंबून असल्यामुळे शेतीला पाणी व्यवस्थापनासाठी निसर्गावरती च अवलंबून राहू नये , शेतीला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे व शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पादनात भर व्हावी यासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकऱ्यासाठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हाती घेतली आहे . ही योजना कृषी विभागामार्फत mahadbt पोर्टल द्वारे राबवली जाते .
🔹ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:-
▪️शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन उपलब्ध करून देणे.
▪️जुनी विहीर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य करणे.
▪️ नवीन विहीर बांधकामासाठी अनुदान
▪️तुषार सिंचन
▪️ इनवेल बोअरिंग
▪️PVC pipe
▪️वीज जोडणी
▪️ पंप संच
▪️परसबाग
▪️शेततळ्याचे प्लास्टिक अनावरण
🔹पात्र जिल्ह्याची नावे:-
ही योजना राज्यातील मुंबई , रत्नागिरी , सांगली , कोल्हापूर , सातारा , सिंधुदुर्ग वगळता इतर सर्व जिल्ह्याकरिता राबविण्यात येत आहे .
🔹ह्या योजनेकरीता मिळणारे अनुदान:-
▪️नवीन विहीर :- 2.50 लाख
▪️जुनी विहीर बांधकामासाठी:- 50 हजार
▪️ इनवेल बोअरिंग :- 20 हजार
▪️PVC pipe:- 30 हजार
▪️ठिंबक सिंचन:- 50 हजार
▪️ पंप संच:- 20 हजार
▪️ तुषार सिंचन:- 25 हजार
▪️वीज जोडणी:- 10 हजार
▪️शेततळे प्लास्टिक अनावरण:- 1 लाख
▪️परसबाग:- 500 रु.
🔹पात्रता:-
या योजनेसाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
▪️अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
▪️वैध जात प्रमाणपत्र असणे आवश्यक.
▪️7/12 आणि 8-अ उतारा आवश्यक.
▪️वार्षिक उत्पन्न ₹1.50 लाखांपर्यंत असावे.
▪️जमीनधारणा 0.20 ते 6 हेक्टर असावी.
▪️नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन आवश्यक आहे.
🔹आवश्यक कागदपत्रे:-
योजनेच्या घटकानुसार कागदपत्रांमध्ये थोडाफार फरक असू शकतो. साधारणपणे खालील कागदपत्रे आवश्यक असतात
▪️जात प्रमाणपत्र
▪️7/12 व 8 अ उतारा
▪️ उत्पन्न प्रमाणपत्र
▪️ प्रतिज्ञापत्र
▪️ ग्रामसभेचा ठराव
▪️ तलाठी प्रमाणपत्र
▪️ कृषी अधिकाऱ्याचा अहवाल
▪️शेताचा फोटो
▪️ गटविकास अधिकाऱ्याची शिफारस
🔹अर्ज कसा करावा:-
▪️ mahadbt शेतकरी पोर्टल वर नोंदणी करा.
▪️ लॉगिन करून संबंधित योजना निवडा .
▪️आवश्यक माहिती भरा.
▪️ कागदपत्रे अपलोड करा.
▪️अर्ज अंतिम सबमिट करा.
▪️अर्जाची वेळोवेळी स्थिती तपासा .
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अश्याच योजनेच्या माहितीसाठी https://www.marathi article.site या वेबसाइटवर भेट द्या .आम्ही वेळोवेळी नवीन योजनेच्या माहितीसाठी, अपडेट देत राहतो .
धन्यवाद !!
Amazon वर सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा
या लेखात दिलेल्या शिफारस केलेल्या Amazon उत्पादनांची अधिक माहिती, सध्याची किंमत, ऑफर्स आणि ग्राहकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👉Amazon वर उत्पादन पाहा आणि खरेदी करा
Comments
Post a Comment