Top 10 best motivational hindi movies

सिनेमा म्हणलं तर आवडीचा विषय , कोणाला नाही आवडत सिनेमा अशे खूप कमी लोक असतील ज्यांना सिनेमात रस नसेल किंवा सिनेमा बद्दल चर्चा नसतील करत .लहानपणी सिनेमा बघायचं म्हणलं तर घरातील सर्वजण tv वरती आनंदाने सामूहिक सिनेमा बघायचे . तेव्हा मोबाईल नसायचे , करमणुकीच साधन फक्त tv च होती . रात्रीला सर्वजण एकत्र येऊन सिनेमा बघायचे तेव्हाचे दिवस खूपच वेगळे होते तेव्हा सामूहिक सिनेमा बघायला खूप मज्जा यायची . आवडत्या अभिनेत्याला त्याचा अभिनय बघून सर्वजण हसायचे वेगळच आकर्षण वाटायचं . आजकाल मोबाईल चा वापर खूप वाढला त्यामुळे सामूहिक सिनेमा बघण्याची परंपरा मोडली .तो एक काळ होता ,आणि आजचा काळ खूप वेगळा आहे.असो काळानुसार परिस्थिती ही बदलत असते . आजच्या इंटरनेट च्या युगात कोणताही सिनेमा उपलब्ध आहे ,जो सिनेमा आपल्याला आवडतो किंवा बघायचा आहे तो सिनेमा आपण internet वरून सर्च करून बघू शकतो .खूप movies दरवर्षी release होतात, काही movies comedy ,acting ,suspense ,thriller,crime, investigation,drama, याधारित असतात. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टी वरुनच आधारित सिनेमा ची कथा असते .काही movies नकारात्मक प्रभाव समाजावर टाकत असतात तर काही सकारात्मक प्रभाव टाकत असतात. असेच काही movies चे नावे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या movies बघितल्यानंतर खरोखरच तुम्हाला आनंद वाटेल आणि तुमच्यावर त्या movies चा सकारात्मक प्रभाव पडेल. या movies तुम्ही परिवारासोबत पण बघू शकता आणि प्रत्येकांनी या movies बघितल्याच पाहिजे . Movie list 1.3 idiots 3idiots हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड हिंदी चित्रपट आहे.ही अशी एकमात्र movie आहे की बॉलिवूड मध्ये सर्वात आधी box office वर 200+ crore collection केलं होत.चेतन भगतच्या Five point someone ह्या पुस्तकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले.ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य, मोना सिंग आणि परीक्षित साहनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूड च्या मागील सर्व movies चे रेकॉर्ड तोडले होते.हा चित्रपट सर्वांच्या आठवणीत राहून गेला .हा चित्रपट कॉलेज लाईफ , जीवनातील निर्णय, शिक्षणपद्ती, success life यावर भाष्य करतो . चित्रपटाची कथा खूप मजेशीर आहे. 2.super 30 Super 30 हा २०१९ चा हिंदी भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे जो विकास बहल दिग्दर्शित, संजीव दत्ता लिखित phantom films, nadiadwala grandson entertainment , relianceentertainment, आणि HRX films निर्मिती आहे. चित्रपट शिक्षण पद्धतीवर आहे.हृतिक रोशन शिक्षक आनंद नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारतो. गरीब मुलांना पैशाअभावी चांगलं शिक्षण मिळत नाही त्यांना चांगल्या भविष्यातील शिक्षण सुविधा मिळत नाही .त्या मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगल्या शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो. त्याने केलेल्या प्रयत्नामुळे गरीब मूल खूप मोठ्या मोठ्या पदावर जातात. कोणतीही परिस्थिती मधे माणूस यशस्वी होतो हे त्याने या चित्रपटात दाखवून दिले आहे . चित्रपटात dialogue, emotional scene, inspiration, success ह्या गोष्टी भरपूर आहेत.राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा.नंदीश संधू त्याच्या चित्रपट पदार्पणात, वीरेंद्र सक्सेना , मृणाल ठाकूर तिच्या पहिल्या मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटात, पंकज त्रिपाठी , आदित्य श्रीवास्तव आणि अमित साध , एका विशेष भूमिकेत, हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. 3.12th fail १२ th fail २०२३ चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे जो विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित, निर्मित आणि लिहिलेला आहे .हा चित्रपट 2019 मध्ये अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या मनोज कुमार शर्मा यांच्याबद्दलच्या काल्पनिक कथानकावर आधारित आहे या चित्रपटात विक्रांत मेस्सी मनोज कुमार शर्मा च्या प्रमुख भूमिकेत आहेत तसेच सहकारी मेधा शंकर , अनंत व्हि जोशी, अंशुमन पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी आहेत .या चित्रपटात मनोज कुमार शर्मा हा गरिबीवर मात करत महसूल क्षेत्रातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे upsc परीक्षा पास होऊन अधिकारी बनले. वारंवार अपयश येऊन सुद्धा त्यांनी हार नाही मानली .पूर्ण जिद्दीने व महत्त्वाकांक्षा ने मोठ्या पदावर गवसणी घातली हा त्यांचा संपूर्ण प्रवास खूप खडतर होता .या चित्रपटात खूप काही घेण्यासारखं खूप काही आहे . परिस्थिती कशीही असो जर महत्त्वाकांक्षा असेल ,जिद्द, चिकाटी , मेहनत आणि दृढ निश्चय असेल तर तो यशस्वी होऊ शकतो हेच या चित्रपटात दाखवून दिले आहे. या चित्रपटात तुम्हाला drama,comedy, relationship, inspiration,violence, struggle हे सर्व बघायला मिळेल. 4.Dangal दंगल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड हिंदी चित्रपट आहे. महावीरसिंह फोगट ह्या माजी भारतीय कुस्तीपटूवर आधारित असलेल्या या चित्रपटात आमिर खानने महावीरसिंह फोगटाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की गीता फोगट,आणि बबिता कुमारी ह्या आपल्या मुलींना महावीरसिंह फोगट कुस्ती शिकवण्याचे कार्य करतात.2010 राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत गीता फोगट आणि बबिता कुमारी भाग घेते आणि 55 किलो गटात कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून गीता फोगट सुवर्णपदक जिंकून पहिली भारतीय महिला ठरते. ह्याच स्पर्धेत भाग घेतलेल्या बबिता कुमारीला देखील रौप्य पदक मिळते.ह्या विजयानंतर समाजात एक आदर्श निर्माण होतो. हमारी छोरी क्या छोरो से क्या कम है ही म्हण खरी ठरते. समाजात स्त्री जातीला चूल आणि मूल साठीच फक्त महत्व होत ती मानसिकता पुसण्याचं काम ह्या चित्रपटात दाखवल्या गेले आहे.स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत, हे या चित्रपटात दाखवून दिले आहे.हा चित्रपट समाजातील स्त्रिया बद्दल असलेली भावना, मानसिकता, आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करतो.हा चित्रपट समाजहितासाठी खूप महत्वाचा आहे. 5.Padman Padman हा हिंदी बॉलीवूड चित्रपट 9 फेब्रुवारी 2018 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.Padman हा चित्रपट आर बाल्की दिग्दर्शित असून अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत.राधिका आपटे आणि सोनम कपूर देखील सहकारी भूमिकेत आहेत.हा चित्रपट सामाजिक संदेश देतो , स्त्रीच्या मासिक पाळीत स्त्री ला कस हिणवल्या जाते , सामाजिक कार्यक्रमात दूर ठेवल्या जाते , ही समाजाची मानसिकता दाखवण्याचं काम करतो . मासिक पाळी ही नैसर्गिक असून हीन भावनेनं बघायला नाही पाहिजे हा संदेश हा चित्रपट देतो.मासिक पाळी मध्ये स्त्रियांना होणारा त्रास तसेच मासिक पाळी मुळे होणाऱ्या रोगराई बद्दल जागरूकता तसेच प्रचार केला आहे .मासिक पाळी बद्दल ह्या चित्रपटात खुलेपणाने बोलल्या गेले आहे समाजात अशा गोष्टी बद्दल चर्चा होत नसते . तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून त्यांनी समाजातील काही लोकांचा विरोध झुगारून त्यांनी त्यांचा प्रसार, प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. 6.swades Swades हा 2004 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान ची प्रमुख भूमिका आहे.Swades (2004) हा एक अत्यंत प्रेरणादायी हिंदी चित्रपट असून तो आपल्या देशाशी असलेल्या नात्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. हा चित्रपट फक्त देशभक्ती दाखवत नाही, तर “देशासाठी आपण काय करू शकतो?” हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो. चित्रपटाची कथा अशी आहे की मोहन भार्गव हा अमेरिकेतील NASA मध्ये काम करणारा भारतीय शास्त्रज्ञ आहे. तो अनेक वर्षांपूर्वी भारत सोडून परदेशात स्थायिक झाला असतो.आपल्या बालपणी सांभाळ करणाऱ्या कावेरी अम्मा यांना भेटण्यासाठी तो भारतात परत येतो.गावात आल्यानंतर त्याला भारतातील वास्तव परिस्थिती दिसते गरीबी, वीज-पाण्याचा अभाव, जातिभेद, शिक्षणाची कमतरता. या सगळ्या गोष्टी पाहून त्याच्या मनात बदल घडतो.शेवटी तो परदेशातील मोठी नोकरी सोडून भारतातच राहण्याचा निर्णय घेतो आणि गावाच्या विकासासाठी काम करतो. 7.zindagi na milegi dobarra Zindagi na milegi dobarra हा चित्रपट हिंदी असून 2011 साली प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ,kalki केकला ह्यांनी प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटाची कथा अशी आहे की तीन जिवलग मित्र — कबीर, अर्जुन आणि इमरान — कबीरच्या लग्नाआधी स्पेनला रोड ट्रिपला जातात.या प्रवासात प्रत्येक जण आपापल्या भीती, अपूर्ण स्वप्नं आणि अंतर्गत संघर्षांशी सामना करतो.स्कायडायव्हिंग, डीप सी डायव्हिंग, बुल रनिंग अशा अनुभवांतून ते स्वतःला नव्याने ओळखू लागतात. या प्रवासात त्यांना उमगतं की आयुष्य फक्त काम, पैसा आणि जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित नसतं. चित्रपट खूप काही सांगून जातो जसे की जीवन कसे हसत हसत जगावे .भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचा अती नकारात्मक विचार न करता वर्तमानात सुखाने जगायला शिका ,पैसा आणि काम महत्वाच असेल तरी आनंद आणि अनुभव त्याहून ही मोठे आहेत , आयुष्य एकदाच मिळत पुन्हा पुन्हा आयुष्य नाही त्यामुळे स्वतः साठी वेळ काढण स्वार्थी नाही ते गरजेचं आहे . 8 yeh Jawani Hai deewani Yeh Jawani Hai deewani हा हिंदी चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला आणि ह्या चित्रपटाच दिग्दर्शन अयान मुखर्जी ने केलं आहे .ह्या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.ह्या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे प्रमुख भूमिकेत आहेत तर आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन यांनीही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.Ye Jawaani Hai Deewani हा चित्रपट तरुणाईच्या मनात असलेली स्वप्नं, करिअरची धडपड, मैत्रीचं महत्त्व आणि नात्यांची किंमत अतिशय सुंदरपणे मांडतो. आयुष्याच्या वेगात हरवलेली माणुसकी आणि भावना पुन्हा आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की कबीर (बनी) हा स्वप्नाळू आणि प्रवासप्रेमी तरुण असतो. त्याला आयुष्यभर जग फिरायचं असतं.नैना मात्र शांत, अभ्यासू आणि जबाबदार स्वभावाची असते.कॉलेज ट्रिपपासून सुरू झालेली मैत्री, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना बदलते.यश, पैसा आणि स्वप्नांच्या मागे धावताना कबीरला जाणवतं की —👉 खरी आनंदाची किल्ली ही आपली माणसं आणि नाती आहेत. 9.bhaag milka bhaag Bhaag Milka Bhaag हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला असून ह्या चित्रपटाच दिग्दर्शन आणि निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा आहेत .ह्या चित्रपटाची कथा लोकप्रिय धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनपटावर आणि त्यांनी जीवनातील केलेल्या संघर्षावरती आधारित आहे .ह्या चित्रपटामध्ये फरहान अख्तर ची यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अपयश, वेदना आणि भीती यांवर मात करून यश कसं मिळवता येतं, हे प्रभावीपणे दाखवतो. चित्रपटाची कथा अशी आहे की फाळणीच्या काळात कुटुंब गमावलेला मिल्खा सिंग लहानपणापासूनच संघर्ष पाहतो.दारिद्र्य, भीती आणि भूतकाळातील जखमा असूनही तो हार मानत नाही.भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यातील धावपटू जागा होतो.सततचा सराव, कठोर शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तो भारताचा “Flying Sikh” बनतो. 10.Lakshya Lakshya हा हिंदी चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता .ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहान अख्तर असून निर्माते रितेश सिधवानी आहेत.ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका हृतिक रोशन, अमिताभ बच्चन,आणि प्रीती झिंटा यांनी साकारली आहे.Lakshya हा चित्रपट आयुष्यात दिशा नसलेल्या तरुणापासून देशासाठी लढणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. हा चित्रपट सांगतो की उद्दिष्ट (Lakshya) मिळालं की माणूस पूर्णपणे बदलू शकतो.चित्रपटाची कथा अशी आहे की करण शेरगिल हा श्रीमंत घरातील, उद्दिष्टहीन तरुण असतो.आयुष्यात काय करायचं आहे याची त्याला स्वतःलाच कल्पना नसते.नंतर तो भारतीय सैन्यात दाखल होतो, पण सुरुवातीला त्याला कठोर शिस्त सहन होत नाही.अपयश, टीका आणि स्वतःच्या कमतरता यांना सामोरं जाताना तो हळूहळू बदलतो.कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर करण एक जबाबदार आणि धाडसी अधिकारी बनतो.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 : आली महत्वाची भेट