| 🔹प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना |
भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील जवळपास 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे.शेती ही जवळपास निसर्गावरती अवलंबून असल्यामुळे पीकपाणी आणि हवामान यावरती शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते.शेती मधील पीक उत्पन्न वाढण्यासाठी पाऊस पाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरडवाह शेतीमध्ये पाण्याअभावी शेतीचे उत्पन्न आणि पिकांची गुणवत्ता ही कमी होते. एखाद्या वर्षी पाणी पाऊस कमी झाला तर विहीर, शेततळे, पाटबंधारे यातील जलसाठा कमी पडू शकतो त्यातच शेतीला वेळेनुसार पाणी पुरत रहावे याकरिता या योजनेमधून मिळवलेल्या सिंचनाचा उपयोग होतो.शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करता यावा,व कमी पाण्यात शेतीतील उत्पन्न वाढावे याकरिता भारत सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंमलात आणली.
आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल सविस्तर माहिती, ही योजना काय आहेत,ह्या योजनेचे काय फायदे आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
🔹प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही एक भारत सरकारची कल्याणकारक महत्वाची योजना आहे.ही योजना 1 जुलै 2015 रोजी अधिकृतपणे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, जलसंपदा विभाग, भूसंसाधन विकास या विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. देशातील शेतीचे उत्पन्न वाढविणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना भारत देशातील सर्व राज्यांकरिता आणि केंद्र शासित प्रदेशाकरिता लागू आहे . विविध राज्यांमध्ये या योजनेची पार्श्वभूमी व गरज लक्षात घेता अंमलबजावणी वेगळी असू शकते.
🔹योजनेचे मुख्य उद्दिष्ट आणि कार्य
- देशातील अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प मोठे आणि मध्यम प्रकल्प पूर्णत्वास नेणे.
- लहान सिंचन प्रकल्प ,जसे की शेततळे, पाटबंधारे भूजलसाठा विकसित करून नवीन जलस्रोत तयार करणे.
- पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जलसाठा वाढविणे.
- कोरडवाहू क्षेत्र पाण्याखाली आणून शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे.
- शेतीमध्ये पाण्याचा वापर कार्यक्षम करणे, शेतामध्ये ठिबक सिंचन , तुषार सिंचन यामुळे प्रत्येक पिकाला आवश्यक पाणी मिळेल या पद्धतीचा अवलंब करणे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या आधुनिक यंत्राद्वारे वाटेल तितके आणि प्रत्येक पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत राहते.
- शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
🔹ठिबक आणि तुषार सिंचन कसे काम करते.
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे दोन्ही वेगवेगळे आधुनिक यंत्र आहेत.हे दोन्ही संच पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, व प्रत्येक पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत राहील यासाठी शेतीमध्ये याचा उपयोग होतो. ठिबक सिंचन हे एका छोट्या नळीसारखे असतात ज्यातून विशिष्ट अंतरावर थेंब थेंब पाणी पिकाजवळ पडत राहते, प्रत्येक झाडाला थेंब थेंब पाणी पडत असल्यामुळे पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत राहते आणि तुषार सिंचन हे फवारणीसारखं विशिष्ट अंतरावर पाणी पडत राहते हे सोयाबीन, कापूस, मूग,तूर, मका, गहू आणि इतर जवळपास सर्वच पिकांमध्ये याचा वापर करता येतो.
🔹किती अनुदान मिळते.
ह्या योजनेच्या खर्चासाठी केंद्र सरकार 60% आणि राज्य सरकार 40% वाटा उचलतात.
सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान
- अल्प व अत्यल्प भूमीधारक शेतकरी - 55%
- इतर शेतकरी - 45%
🔹पूरक अनुदान आणि प्रत्यक्ष मिळणारे एकूण अनुदान
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी:
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान: २५%
एकूण मिळणारे अनुदान = ८०%
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) शेतकरी:
या प्रवर्गातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' किंवा 'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अधिक पूरक अनुदान मिळून जास्तीत जास्त ९०% पर्यंत लाभ मिळू शकतो.
- इतर (बहुधारक) शेतकरी:
मूळ अनुदान: ४५%
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान: ३०%
एकूण मिळणारे अनुदान = ७५%
🔹अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1.7/12 उतारा
2.8अ उतारा.
3. वीज बिलाची प्रत.
4.ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदी केल्याचे बिल.
5. आधार कार्ड
6. पॅन कार्ड
7. मतदान ओळख प्रमाणपत्र ( असल्यास)
8. मोबाईल क्रमांक
9. बँक खाते क्रमांक
🔹योजनेसाठी पात्रता
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असायला हवे.
- 7/12 उतारा आणि 8 अ प्रमाणपत्र आवश्यक.
- सामूहिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास संबंधित व्यक्तीचे संमतीपत्र आवश्यक आहे.
- जर शेतकरी अनुसूचित जाती (SC),आणि अनुसूचित जमाती (ST)जातीवर्गाचा असेल तर शेतकऱ्याकडे जातप्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच लाभ घेण्यास पात्र असेल.
- शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमची जोडणी अनिवार्य आहे त्यासाठी विद्युत बिलाची ताजी प्रत सादर करणे आवश्यक असेल.
- सूक्ष्म सिंचन प्रणाली ही फक्त अधिकृत कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
- पात्र शेतकरी लाभार्थ्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्याने ज्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतलेले सूक्ष्म सिंचन खरेदी पावत्या आहेत त्या 30 दिवसाच्या आत अपलोड कराव्यात.
- जर लाभार्थ्याने 2016-17 च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरवर लाभ घेतला असेल तर तो लाभार्थी पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबर वर लाभ घेण्यास पात्र नसेल आणि जर लाभार्थ्याने 2017-18 च्या नंतर ह्याच घटकांतर्गत लाभ घेतला असेल तर त्याला त्याच सर्वे नंबर वरून पुढील 7 वर्षे लाभ घेण्यास पात्र नसेल.
🔹अर्ज कसा करावा
- शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करताना mahadbt पोर्टल वर नोंदणी करा.
- प्रधानमंत्री प्रति थेंब अधिक पिक योजना निवडून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा.
- अधिकृत विक्रेत्याकडून ठिबक व तुषार सिंचन विकत घेऊन त्याची खरेदी प्रत अपलोड करावी.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात मिळते.
🔹निष्कर्ष
शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजनेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होते.कमी पाण्यात शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी,व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी व वेळेची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या आधुनिक यंत्राचा चांगला उपयोग होतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.
🔹अधिकृत वेबसाइट -
https://mahadbt.maharashtra.gov.in
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अशाच शासकीय योजना, शेती, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी https://www.marathiarticle.site ला नियमित भेट द्या. आम्ही वेळोवेळी नवीन आणि विश्वासार्ह माहिती प्रकाशित करत असतो.
Comments
Post a Comment